दीपक चुडनाईक यांना आमदार विठ्ठल चव्हाण जीवनगौरव

यंदाचा ‘आमदार विठ्ठल चव्हाण जीवनगौरव पुरस्कार’ निष्ठावंत शिवसैनिक आणि परळच्या शाखा क्र. 203 चे कार्यालय प्रमुख दीपक चुडनाईक यांना शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत आणि माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ, शिवराज प्रतिष्ठान आणि विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक व शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे ‘आमदार विठ्ठल चव्हाण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

शुक्रवारी शिवसेना भवन येथे पार पडलेल्या सोहळ्याला पराग चव्हाण, आनंद गावकर, प्रभाकर मोरजकर, महेंद्र विचारे, रूपेश कोचरेकर, अभिषेक जामदार, संतोष कांबळी, दिनेश लोखंडे, राजेश परब, प्रफुल्ल गावकर, नामदेव ओटवकर, सुवर्णा गुराम, नीलम मिरगळ यांच्यासह लालबाग-परळमधील शिवसैनिक उपस्थित होते.