
गरोदर असलेल्या तनिषा भिसे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार केले नाही. त्यामुळे भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म देऊन त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
तनिषा भिसे या गरोदर होत्या आणि त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. पुण्याच्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने भिसे यांच्या पतीकडे 20 लाख रुपयांचे डिपॉझिट मागितले. एवढी मोठी रक्कम द्यायला वेळ लागेल तुम्ही उपचार सुरू करा अशी विनंती भिसे यांच्या पतीने केली. पण रुग्णालयाने भिसे यांना रक्तस्राव होत असतानाही त्यांना साडेपाच तास बसवून ठेवले आणि उपचार केले नाही. त्यामुळे भिसे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. अखेर या प्रकरणाची डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.