देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. मुंबईतील ‘लालबागच्या राजा’प्रमाणे यंदा राजस्थानमधील ‘उदयपूरचा राजा’ची चर्चा सुरू आहे. श्री स्वस्तिक विनायक गणपती मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची मूर्ती 41 लाख 41 हजार 441 रुपयांच्या 500-500 रुपयांच्या नोटांनी सजवण्यात आली आहे. गणपती बाप्पाला दररोज वेगवेगळा शृंगार केला जातो. शनिवारी बाप्पाला नोटांचा शृंगार करण्यात आला. 500, 200, 100, 50 रुपयांच्या नोटांनी सजवण्यात आले. लंबोदराच्या सोंडीला 1 रुपयांच्या नोटेने सजवले.
महाराष्ट्रातली मूर्ती
यंदाच्या गणेशोत्सवासाठी खास महाराष्ट्रातून मूर्ती मागवण्यात आली. ही आकर्षक मूर्ती पोहोचण्यासाठी अडीच दिवस लागले. मूर्ती पाहण्यासाठी भक्त गर्दी करत आहेत. ते गुलाब, चंदन, केवडा, मोगरा घेऊन येत आहेत. भक्तांची गर्दी वाढत असल्याने मंडपाबाहेर मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे, असे श्री स्वस्तिक विनायक गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव अग्रवाल यांनी सांगितले.