
वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्यात ई-बाईकला परवानगी देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी धावतील. मात्र या निर्णयाला टॅक्सी व रिक्षाचालकांकडून विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे प्रदूषणात घट होईल. या ई-बाईक टॅक्सीला रिक्षा व टॅक्सीचालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रिक्षा व टॅक्सीचालकांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या ई-बाईकमुळे दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल, असा दावा परिवहनमंत्र्यांनी केला आहे.
पाच रुपये प्रति किमी दर
एका लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 35 शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. पाच रुपये प्रती किमी भाडे आकारण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगर प्रदेशात एक लाख ई बाइक टॅक्सी धावतील असा प्राथमिक अंदाज आहे.