
जम्मू-कश्मीर टेरर फंडिंगप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले जम्मू-कश्मीरमधील खासदार शेख अब्दुल राशिद यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला. राशिद यांना जामीन दिला गेला तर त्यांच्यावर अनेक अटी-शर्ती लागू होऊ शकतात. त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली लोकसभेतील कामकाजात सहभागी होण्याचा आदेश द्यावा का, असे न्यायालय म्हणाले. दरम्यान, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने राशिद यांना जामीन देण्यास कडाडून विरोध केला आहे.