
म्यानमारच्या भूकंपातील मृतांची संख्या 1,644 वर पोहोचली असून 3,408 जण जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आजही म्यानमारला भूकंपाचे हादरे बसले. दरम्यान, यूएसजीएस संस्थेने भूकंपातील मृतांचा आकडा 10,000 हून अधिक असू शकतो अशी भीती व्यक्त केली.
हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’
म्यानमारच्या मदतीसाठी हिंदुस्थान सरसावला असून एनडीआरएफच्या 80 जवानांची तुकडी पाठवण्यात आली आहे. तसेच ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत हिंदुस्थानने म्यानमारला 15 टन मदत साहित्य पाठवले आहे.