मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका युट्युब चॅनेलच्या व्हिडीओवर एका कमेंटमधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या कमेंटमध्ये म्हटले आहे की इच्छूक उमेदवार म्हणून भेटायला येणार आणि गेम करणार. बजाज बिश्नोई लीडर अशा नावाच्या फेक अकांटवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना जे कोणी भेटायला येतील त्यांची कडक तपासणी केली जाईल आणि मगच आत सोडले जाईल. तसेच जरांगे पाटील हे सध्या सरपंच मळा इथे बैठकीसाठी थांबले आहेत तिथे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.