अर्थसंकल्पापेक्षा कुंभमेळ्यातील मृतांची माहिती महत्त्वाची

महाकुंभात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी आमच्यासाठी अर्थसंकल्पापेक्षा महत्त्वाची आहे. या दुर्घटनेत किती लोक मरण पावले, किती बेपत्ता झाले किंवा जखमी झाले याची माहिती सरकार सांगत नाही. सरकारने मृतांचे खोटे आकडे दिले आहेत. हिंदूंच्या या सर्वात मोठ्या पर्वाची ते व्यवस्था करू शकत नाहीत. चेंगराचेंगरीत लोक मरतील अशी त्यांच्या विकसित भारताची व्याख्या आहे का?