आयटीआर-यूसाठी 31 मार्चपर्यंत डेडलाइन

अतिरिक्त दंड टाळण्यासाठी आयकर विभागाने करदात्यांना त्यांचे अपडेट केलेले आयटीआर-यू दाखल करण्यासाठी 31 मार्च 2025 ही डेडलाइन दिली आहे. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरल्यास 25 टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे, तर 31 मार्चनंतर रिटर्न भरल्यास 50 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. अपडेटेड आयटीआर रिटर्न यू म्हणजे करदात्यांनी स्वच्छेने न नोंदवलेले उत्पन्न किंवा आधीच्या आयटीआर रिटर्नमधील काही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी केलेले आयटीआर-यू होय.