Warner The Robinhood – चौकार अन् षटकारांची आतषबाजी करणारा डेव्हिड चाहत्यांना दिसणार नव्या भूमिकेत

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आता चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. IPL 2025 मध्ये कोणत्याच संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दिसणार नसला तरी, मोठ्या पडद्यावर एका नव्या भुमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा पहिला लुक आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

डेव्हिड वॉर्रनरने टी-20 वर्ल्डकप 2024 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच आयपीएलमध्येही त्याला कोणत्या संघाने खरेदी केले नाही. परंतु डेव्हिड वॉर्नर तेलुगू चित्रपट रॉबिनहूडच्या (Robinhood) माध्यामातून चाहत्यांना आपली झलक दाखवणार आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपटा असून चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. रॉबिनहूड चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या चाहत्यांनी याची माहिती दिली आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, हिंदुस्थानी चित्रपटात मी येत आहे, रॉबिनहूडचा भाग झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. चित्रपटातील शुटींगचा माझा अनुभव खूपच जबरदस्त होता, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 383 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 18,995 धावा केल्या आहेत. कोसटीमध्ये त्याने 44.59 च्या सरासरीने 8786 धावा त्याने केल्या आहेत. डेव्हिडीने वनडेमध्ये 45.30 च्या सरासीने 6932 धावा आणि टी-20 मध्ये 33.43 च्या सरासरीने 3277 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये त्याने 40.52 च्या सरासरीने 6565 धावा केल्या आहेत.