टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत झालेला पराभव अवघ्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या जिव्हारी लागला आहे. हा पराभव पचवणे कठीण जात असल्यामुळे आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर हताश झालाय. या पराभवानंतरही आपला संघ पुन्हा एकदा मजबुतीने उभा राहील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिकेने आपल्यावर गेल्या तीन दशकांपासून लागलेला ‘चोकर्स’चा शिक्का काही अंशी पुसताना आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण शेवटच्या क्षणी हिंदुस्थानकडून सहन कराव्या लागलेल्या सात धावांच्या पराभवाने हा जिगरबाज संघ शोकसागरात बुडाला आहे. अंतिम पराभूत दक्षिण आफ्रिकन संघ मायदेशात परतल्यानंतर मिलरने आपल्या भावना ‘एक्स’वर पोस्ट केल्या. गेले दोन दिवस तो मौन होता.
झोपेची डुलकी महागात पडली; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्याची संधी गमावली, नक्की काय घडलं?
त्याने लिहिलं, ‘मी खूप निराश आहे. दोन दिवसांपूर्वी जे झालं ते पचवणं खूप कठीण जातंय. मी माझ्या भावना शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. आम्ही हरलो असलो तरी माझ्या संघाचा मला अभिमान आहे. वर्ल्ड कपमध्ये आमची कामगिरी जबरदस्त झाली. आम्ही पूर्ण महिन्यात अनेक चढउतार पाहिले. आम्ही खूप त्रास सहन केलाय. आमच्या संघात एक जिद्द आहे आणि आमच्या खेळाचा स्तरही दर्जेदार असल्याचे मिलर म्हणाला. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना फलंदाजीला असलेल्या मिलरने हार्दिक पंडय़ाच्या पहिल्याच चेंडूला सीमीरेषेवरून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा सूर्यपुमार यादवने त्याचा अद्भुत झेल टिपला आणि पूर्ण सामनाच फिरवला.’