दत्ताराम शिंदे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. निष्ठावंत शिवसैनिक असलेले दत्ताराम शिंदे हे चिखलवाडी विभागाचे माजी शाखाप्रमुख तसेच माजी नगरसेवक होते. शीव कोळीवाडा विधानसभा निरीक्षक म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.