‘एक्स’चा डेटा लीक; 20 कोटी युजर्सना धोका

एलन मस्क यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या (पूर्वीचे ट्विटर) 20 कोटी युजर्सचा डेटा लीक झाला आहे. युजर्सचे ईमेल आयडी, नाव आणि अन्य अकाऊंट डिटेल्स लीक झाले आहेत. साधारण  9.4 जीबी साईझचा हा रेकॉर्ड आहे.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात डेटा लीक झाल्यामुळे फिशिंग, ओळख चोरी आणि अन्य प्रकारच्या ऑनलाइन हल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे युजर्सने सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण ईमेल आयडीला जोडलेले अकाऊंट्स किंवा डिव्हाईसचा डेटा हॅकर्स शेअर करण्याची शक्यता आहे.

l लीक झालेला डेटाबेस 7 जुलै 2004 रोजी ‘मिचुपा’ नावाच्या नव्या अकाऊंटद्वारे जारी केलेला होता. लीक झालेल्या डेटामध्ये एक डाऊनलोडेबल लिंक आहे, जी प्रभावित युजर्सला त्रासदायक ठरू शकते.

l लीक झालेल्या ‘एक्स’ अकाऊंटशी जे ईमेल आयडी जोडलेले आहेत, त्यांच्यावर स्पॅम, फिशिंग अटॅकचा होण्याची शक्यता आहे. युजर्सचे नाव आणि त्याची अन्य माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

कसे रहाल सुरक्षित

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ‘एक्स’चा डेटा लीक झाल्याने युजर्सने  स्वतःचे अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी युजर्सने पासवर्ड बदलावे. ट फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा तसेच संशयास्पद मेल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. युजर्सने अकाऊंटची ऑक्टिव्हिटी आणि ज्या डिवाईसवर अकाऊंट लॉगइन आहे, त्यावर लक्ष ठेवावे. कंपन्यांनी मजबूत सुरक्षा प्रणाली आणि डेटा सेफ्टीच्या उपाययोजना कराव्यात. वेळोवेळी सिक्युरिटी ऑडिटच्या माध्यमातून धोका तपासावा. ऑनलाइन हल्ल्याबाबत कर्मचाऱयांमध्ये जागृती करा.