सोशल मीडियाची ओळख पडली महागात, गुंगीचे औषध देवून दापोलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन दापोलील एका अल्पवयीन मुलीवर चिपळूणमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीला एका फार्म हाऊसवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या संबंधित इसमाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अझहर असे या आरोपीचे नाव आहे. अझहर आणि त्या मुलीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. सोशल मीडियावर ओळख झाली तेव्हा अझहर याने वेगळेच नाव सांगितले होते. यानंतर अझहरने मुलीला भेटायचे ठरवले. यासाठी तो एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउसवर तिला घेवून गेला. तेथे त्याने तिला शीतपेय पिण्यास दिले. यामद्ये नराधमाने गुंगीचे औषध मिसळ्यामुळे मुलीला भोवळ आली आणि ती बेशुद्ध झाली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केले आणि फोटोही काढले.

दरम्यान ज्यावेळी मुलीला शुद्ध आली तेव्हा अझहरने मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता खूप घाबरली होती. याचदरम्यान तिला अझहरबाबत अनेक गोष्टी समजल्या. त्यामुळे तिने त्याच्याबरोबर मैत्री ठेवण्यास नकार दिला. याचवेळी अजहर याने माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला.  मुलीने त्यासाठीही नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात अझहर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे संशयित अझहर कडवळकर याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या विविध कलमानुसार (पॉस्को) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.