सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याच्या काळजीबाबत जनमानसात मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झालेली आहे. आपल्या लाईफस्टाईल मुळे शरीरावर होणारे परीणाम, तसेच खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयींमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. परंतु आरोग्याच्या बाबतीत छोट्या टिप्सचा आपण जागरुकतेने आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास खूप सारे प्राॅब्लेम सुटतील.
सध्याच्या घडीला दलिया म्हणजेच लापशी आणि क्विनोआ या दोन्हींची चलती आहे. दलिया (लापशी) मध्ये फायबरची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोटभरीचा पर्याय म्हणून अनेकजण लापशीला पसंती देत आहेत. पचनासाठी लापशी खाणं हे उत्तम मानलं जातं. मुख्य म्हणजे लापशीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे मुबलक प्रमाणात असल्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो आम्ल भरपूर प्रमाणात असतात. यामुळे वजन कमी करण्यावर जे भर देतात, त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय मानला जातो. शिवाय क्विनोआ मध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ग्लूटेन-मुक्त आहार घेणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
तज्ज्ञांच्या मते दलिया आणि क्विनोआमध्ये सर्वात आरोग्यदायी काय आहे तर यावर तज्ज्ञ म्हणतात, मधुमेह आणि किडनीच्या रुग्णांसाठी दलिया म्हणजेच लापशी हा चांगला उत्तम नाही. परंतु किडनीचे रुग्ण कमी प्रमाणात क्विनोआ घेऊ शकतात आणि मधुमेहाचे रुग्ण ते योग्य प्रमाणात घेऊ शकतात. संधिवात आणि दम्याचे रुग्ण देखील क्विनोआ चे सेवन करू शकतात.
(आहारात कोणतेही नवीन पदार्थ दाखल करताना, आपल्या तज्ज्ञ अनुभवी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)