शेअर बाजार उसळला
शेअर बाजार शुक्रवारी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 226 अंकांची वाढ होऊन 78699 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63 अंकांच्या वाढीसोबत 23,813 अंकांवर बंद झाला.
प्रेस्टिज होम कूकिंग
प्रस्टिज या किचन अप्लायन्सेसमधील कंपनीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रेस्टिजला अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांसह गौरविण्यात आले आहे. यावेळी टीटीके प्रेस्टिजचे एमडी व सीईओ वेंकटेश विजयराघवन उपस्थित होते.
क्यूपिडमध्ये नियुक्ती
क्यूपिड लिमिटेडने चार नवीन संचालकांची नियुक्ती करून मंडळाला बळकटी दिली. क्यूपिड लिमिटेडमध्ये स्मिता भटकळ, संतोष देसाई आणि अक्षय कुमार स्वतंत्र संचालक म्हणून सामील झाले आहेत. तर शायना एनसी गैर-कार्यकारी संचालक म्हणून सामील झाल्या आहेत.
श्रेयस मीडिया
विक्री आणि विपणन कंपनी श्रेयस मीडियाला (आध्याश्री इन्फोटेनमेंटची शाखा) महाकुंभमेळा 2025 साठी विशेष जाहिरातीचे अधिकार मिळाले. महाकुंभ 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे.
आईस मेक रेफ्रिजरेशन
आईस मेक रेफ्रिजरेशन लिमिटेडने नवीन व्यावसायिक चेस्ट फ्रीझर्स, कूलर्स आणि विसी कूलर्सचे अनावरण केले. यावेळी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पटेल उपस्थित होते. कंपनीची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता आता 1.25 लाख युनिट्स आहे, ज्यात 72,000 चेस्ट फ्रीझर्स आणि 8,000 विसी कूलर्स समाविष्ट आहेत. आइस मेक रेफ्रिजरेशनचे नवीन उत्पादक नवोन्मेष आणि टिकाऊ वाढीच्या प्रतिमेचे प्रतीक आहे.
चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर
टाटा ईव्हीने चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे मजबूत नेटवर्क उभारण्यावर भर दिला आहे. ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर वेगाने वाढवण्यासाठी टाटा ईव्हीने सहा चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि दोन ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यांच्या सहकार्याने येत्या 12 ते 18 महिन्यांत देशभरात 22,000 इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याचा टाटाचा मानस आहे. टियर 2 आणि 3 शहरांत ईव्हीचा अंगिकार करण्यास टाटा ईव्ही कडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.
स्विगीवर खर्च
मुंबई शहरातील एका स्विगी वापरकर्त्याने फक्त पशुखाद्यावर 15,23,885 रुपये खर्च केले आहेत. भारताने 2024मध्ये स्विगीचा कसा वापर केला आहे असे ‘स्विगी इन्स्टामार्ट आवृत्ती’तून समोर आले आहे. ग्राहकांना हव्या असलेल्या गोष्टी हव्या त्या वेळी उपलब्ध करून देताना खूप अभिमान वाटतो, असे स्विगी इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमितेश झा यावेळी म्हणाले.
44.7 टक्के फसवणूक इंटरनेट-कार्डद्वारे
गेल्या आर्थिक वर्षात इंटरनेट आणि कार्डद्वारे फसवणुकीची प्रकरणे 44.7 टक्के इतकी आहेत. फसवणुकीच्या प्रकरणांपैकी 67.1 टक्के प्रकरणे खासगी बँकांनी नोंदविलेली आहेत. खासगी आणि सार्वजनिक बँकांकडून एकूण दंडाची रक्कम गेल्या आर्थिक वर्षात 86.1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. फसवणुकीच्या प्रकारांमुळे वित्तीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.
बजाज चेतक 35 सीरिज लाँच
बजाज ऑटोने आपली नवीन बजाज चेतक 35 सीरिज हिंदुस्थानात लाँच केली. या स्कूटरमध्ये टीएफटी टचस्क्रीन, म्युझिक कंट्रोल, फक्त 3 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग यासारखे खास फीचर्स दिले आहेत. ही सीरिज तीन व्हेरियंट्समध्ये लाँच केली असून बजाज चेतक 3501 ची किंमत 1 लाख 27 हजार 243 रुपये तर बजाज चेतक 3502 या स्कूटरची किंमत 1 लाख 20 हजार रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर 153 किमीपर्यंतची रेंज मिळणार आहे.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्टस्ची नवी अगरबत्ती कस्तुरी आणि गोल्डन पेटल्स मसाला अगरबत्ती बाजारात दाखल झाली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बंगळुरू कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. दैनंदिन जीवनात पवित्र कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805.