देशभरातील महत्वाच्या घडामोडी

भारतात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आरोग्य

मंकीपॉक्स साथीविषयी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणीचा इशारा दिला असतानाच आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मंकीपॉक्सची साथ असलेल्या देशातून प्रवास करून आलेल्या या संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे, असे आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

पाकव्याप्त कश्मीरातील लोकांनी हिंदुस्थानात यावे ः राजनाथ सिंह

पाकव्याप्त कश्मीरमधील लोकांनी हिंदुस्थानात यावे, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबन मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते. पाकव्याप्त कश्मीरमधील लोकांना हिंदुस्थान पाकिस्तानी नाही तर आपले समजतो. पाकिस्तान तेथील लोकांना परकीयांसारखी वागणूक देतो. त्यामुळे त्यांनी हिंदुस्थानात यावे असे राजनाथ सिंह म्हणाले.