Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 6 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी

आजचे पंचाग

तिथी -फाल्गुन शुद्ध सप्तमी
वार – गुरूवार
नक्षत्र – रोहिणी
योग – विष्कुंभ
करण – विष्टि
राशी – वृषभ

मेष

मेष राशीला आज दिवसभरात शिभ वार्ता कळणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. तसेच व्यय स्थानात राहू असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतो. विनाकारण ताणतणावापासून दूर राहण्याची गरज आहे. एकादश स्थानात शनि असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होण्याची शक्यता आहे. कोणताही शब्द देऊन त्यात अडकू नका. चंद्र आणि शनीच्या पाठबळामुळे आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. घरातील वातावरणही आनंदी राहणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक आणि उत्साहाचा असणार आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तसेच आय स्थानात राहू असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रथम स्थानात गुरु असल्याने कोणतेही काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होतील. पैशांची गुतंवणूक करण्यास चांगला काळ आहे. मात्र, करिअरबाबतचे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

मिथुन

मिथुन राशीच्या खर्चात अचनाक वाढ होण्याची शक्यता आहे. व्यय स्थानात चंद्र अनावश्यक खर्च समोर उभे ठाकू शकतात. दशम स्थानात राहू असल्याने कंटाळा जाणवणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न ठेवल्यास दिवस आनंदात जाणार आहे. भाग्य स्थानातील शनिमुळे त्रास कमी होणार आहे. तसेच व्यय स्थानातील गुरुमुळे ध्यानधारणा किंवा आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होणार आहे. मेडिटेशनमुळे शांती मिळणार आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. एकादश स्थानात चंद्र असल्याने आर्थिक वाढीचे योग आहेत. नवम स्थानात राहू असल्याने कामांचे योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, बोलण्यात संयम ठेवत वादविवाद टाळण्याची गरज आहे. अष्टम स्थानात शनी असल्याने प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकादश स्थानातील चंद्र गुरुमुळे आजचा दिवस आनंदात जाणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांवर अचनाक कामांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. तसेच दशम स्थानातील चंद्रामुळे कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांची मदत मिळणार असल्याने मन प्रसन्न राहणार आहे. बरेच दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, अष्टम स्थानात राहू असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. सप्तमातील शनीमुळे व्यवसायवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, कुटुंबीयांशी मतभेद टाळण्याची गरज आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळणार आहे. भाग्य स्थानात चंद्र असल्याने नशिबाची चांगलीच साथ मिळणार आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्तम स्थानात राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात शनी असल्याने स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच उधार उसनवारी टाळण्याची गरज आहे. लांबचे प्रवास शक्यतो टाळावे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस दगदगीचा असेल. अष्टम स्थानात चंद्र असल्याने प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. दगदगीमुळे थकवा जाणवू शकतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृतीच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात राहू असल्याने गुप्तशत्रूंवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच पंचम स्थानात शनी असल्याने मुलांच्या संदर्भातील समस्या डोके वर कााढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होणार आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संयमाने घालवण्याचा आहे. जोडीदार किंवा मित्रमैत्रिणींशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. तसेच मनःशांती टिकवण्यासाठी संयमाने वागावे लागणार आहे. विनाकारण वादविवाद टाळावे लागतील. सप्तम स्थानात चंद्र असल्याने व्यवसाय वाढीचे योग आहेत. मनासारखी कामे होणार आहेत. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साह टाळण्याची गरज आहे. चतुर्थ स्थानातील कुटुंबीयांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. संयम ठेवत मनःशांतीसाठी प्रयत्न केल्यास आजचा दिवस समाधानाने घालवता येणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांनी प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुने रोग अचानक डोके वर काढू शकतात. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळावे. षष्ठ स्थानात चंद्र असल्याने हितशत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तसेच उधारउसनवारी टाळावी. चतुर्थ स्थानात राहू असल्याने कुटुंबियांशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. तसेच तृतीय स्थानात शनी असल्याने सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. चंद्र पंचम स्थानात असल्याने मुलांबाबत शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच नवीन शिकण्याची आवड निर्माण होणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे मन आनंदी होईल. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्वितीय स्थानातील शनीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज कुटुंबीयांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे घरात उत्साही वातावरण असणार आहे. चंद्र चतुर्थ स्थानात गुरुसोबत घरासाठी काहीतरी खरेदी करण्याचे योग आहेत. मात्र, स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. तृतीय स्थानात चंद्र असल्याने अचानक जवळच्या प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांवर मात करत पुढे जावे लागणार आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांशी जुळवून घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत.

मीन

मीन राशीच्या लोकांना जवळचा प्रवास होण्याची शक्यता आहे. तसेच आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तृतीय स्थानात चंद्र असल्याने मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करण्याची गरज आहे. मनावर संयम ठेवणे आणि राग आवरणे गरजेचे आहे. कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे.नकारात्मक विचार दूर ठेवल्यास आजचा दिवस चांगल्याप्रकारे घालवता येणार आहे.