Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – चैत्र शुद्ध द्वितीया
वार -सोमवार
नक्षत्र – अश्विनी
योग – वैधृती
करण – तैतिल
राशी – मेष

अक्कलकोट स्वामी महाराज प्रकटदिन

मेष

ग्रहस्थिती – चंद्रांचे प्रथम स्थानात भ्रमण, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – साडेसातीचा प्रभाव सुरू होत असल्याने व्यवहारात सावध राहण्याची गरज
आरोग्य – मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज
आर्थिक – अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस शांततेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्राचे व्यय स्थानात भ्रमण, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – अनपेक्षित धनलाभाचे योग मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
आरोग्य – मनावर दडपण येण्याची शक्यता
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – वावदविवाद टाळल्यास घरात समाधानाचे वातावरण राहील

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्राचे आय स्थानात भ्रमण, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढला तरी त्यातून फायदा होण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारे वातावरण आहे
आर्थिक – कामातून मिळणाऱ्या संधीचा फायदा घेण्याचा दिवस
कौटुंबीक वातावरण – मुलांसोबत नवे बेत केल्यास घरातील उत्साह वाढणार आहे.

कर्क

ग्रहस्थिती – चंद्राचे कर्म स्थानात भ्रमण, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – शनीची अडीची संपल्याने नव्या गोष्टींची सुरुवात होणार आहे
आरोग्य – मरगळ आणि मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्राचे भाग्य स्थानात भ्रमण, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – शनीची अडीची सुरु होत असल्याने ताणतणाव वाढण्याची शक्यता
आरोग्य – मनात उत्साह राहणार आहे
आर्थिक – संपत्तीबाबतची कामी मार्गी लावण्याचा प्रयत्न करा
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे सहकार्य मिळणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्राचे अष्टम स्थानात भ्रमण, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – संमिश्र दिवस आहे, प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – धावपळ, दगदग टाळा
आर्थिक – भागीदारी व्यवसायात विशेष लक्ष द्या
कौटुंबीक वातावरण – सहकारी आणि जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्राचे सप्तम स्थानात भ्रमण, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – सकारात्मकता वाढवणारा दिवस
आरोग्य – जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करा, फायदा होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्राचे षष्ठ स्थानात भ्रमण, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – विनाकारण दडपण जाणवण्याची शक्यता
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता असल्याने नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – स्पर्धेतून आर्थिक लाभाची शक्यता
कौटुंबीक वातावरण – चिडचीड टाळत रागावर नियंत्रण ठेवा

धनु

ग्रहस्थिती – चंद्राचे पंचम स्थानात भ्रमण, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे
आरोग्य – स्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नवाढीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – मुलं आणि कुटुंबीयांसोबत छोट्या प्रवासाचे योग

मकर

ग्रहस्थिती – चंद्राचे चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे
आरोग्य – मुलांमुळे कामाचा ताण वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खरेदीचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्राचे तृतीय स्थानात भ्रमण, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग
आरोग्य – डोळे आणि डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – संपत्तीतून लाभाचे योग आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद टाळण्याची गरज

मीन

ग्रहस्थिती – चंद्राचे द्वितीय स्थानात भ्रमण, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस -पैशांशी संबधीत समस्यांवर मार्ग सापडणार असल्याने उत्साह वाढणार आहे
आरोग्य – अनावश्यत ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – आर्थिक संधीचा फायदा घ्या
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांचे सहकार्य मिळणार आहे.