
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन अमावस्या
वार -शनिवार
नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा
योग – ब्रह्मा
करण – किंस्तुघ्न
राशी – मीन
आज सूर्यग्रहण आहे. मात्र, हिंदुस्थानातून दिसणार नसल्याने वेदाधि नियम, सूतककाळ पाळण्याची गरज नाही
शनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिन
मेष
ग्रहस्थिती – चंद्रांचे व्यय स्थानात भ्रमण, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – नकारात्मक दिवस आहे. सावध राहा
आरोग्य – मनावर विनाकारण दडपण येण्याची शक्यता
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
कौटुंबीक वातावरण – वादविवाद, मतभेद टाळा
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्राचे आय स्थानात भ्रमण, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – अनपेक्षित लाभाचे योग आहेत
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबीक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्राचे कर्म स्थानात, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढणार असल्याने ताण वाढेल
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्राचे भाग्य स्थानात भ्रमण, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आधीच्या कामातून मोठे लाभ होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्राचे अष्टम भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आर्थिक – व्यवहार फसगत होणार नाही, याची काळजी घ्या
कौटुंबीक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्राचे सप्तम स्थानात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – सहकारी आणि जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे.
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केल्यास फायदा होणार आहे
कौटुंबीक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्राचे षष्ठ स्थानात, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – काळजी घेत सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – व्यवहारात काळजी घ्या. कागदपत्रे तपासा
कौटुंबीक वातावरण – मतभेद व्यक्त करू नका, अन्यथा वादात अडकण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्राचे पंचम स्थानात भ्रमण, पंचमात राहू, चतुर्थात शनी
आजचा दिवस – शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मुलांमुळे धावपळ दगदग वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – घरात मुलांकडे लक्ष द्या
धनु
ग्रहस्थिती – चंद्राचे चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – उत्साह वाढवणारा दिवस असेल
आरोग्य – पोटदुखीचा त्रास किंवा अपचनाची समस्या जाणवण्याची शक्यता
आर्थिक – वाहनखरेदी, गृहखरेदीचा विचार करण्यासाठी चांगला दिवस
कौटुंबीक वातावरण – कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याचा बेत ठरेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्राचे तृतीय स्थानात भ्रमण, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – भावंडांचे सहकार्य मिळणार आहे
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढणार आहे
कौटुंबीक वातावरण – सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने समाधान लाभणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्राचे द्वितीय भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – अचानक धनलाभ होण्याची शक्यता
आरोग्य – उन्हात बाहेर जाणे टाळावे
आर्थिक – संपत्तीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबीक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य लाभणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्राचे प्रथम स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – महत्त्वाच्या प्रकल्पांवर,योजनांवर काम केल्यास फायदा होणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबीक वातावरण – वागण्या- बोलण्यात काळजी घेतल्यास दिवस शांततेत जाणार आहे