
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन कृष्ण द्वादशी
वार -बुधवार
नक्षत्र – धनिष्ठा
योग – सिद्ध
करण – कौलव
राशी – मकर, दुपारी 3.15 नंतर कुंभ
मेष
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, दुपारनंतर आय स्थानात भ्रमण, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – दिवसाचा उतरार्ध अनपेक्षित धनलाभाचा
आरोग्य – उत्तम राहणार आहे.
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – नातेवाईकांच्या भोटीगाठीचे योग
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात दुपारनंतर कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – नशिबाची चांगली साथ लाभेल, मात्र कामाचा व्याप वाढेल
आरोग्य – अतिउत्साहात जास्त काम ओढवून घेऊ नये.
आर्थिक – कार्यक्षेत्रात कौतुक, चांगले प्रस्ताव येतील.
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात नंतर भाग्य स्थानात भ्रमण, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – दुपारपर्यंत थकवा जाणवेल, नंतरचा दिवस चांगला
आरोग्य – दगदग,धावपळ टाळावी.
आर्थिक – संधीचा फायदा घेतल्यास लाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – मन प्रसन्न राहणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात नंतर अष्टम स्थानात भ्रमण, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – दुपारनंतर दिवस शांततेत घालवावा. वादविवादाची शक्यता
आरोग्य – दुपारनंतर मरगळ जाणवणार आहे.
आर्थिक – संपत्तीबाबत महत्त्वाचे निर्णय होतील
कौटुंबीक वातावरण – भुश समचारामुळे घरातील वातावरण आनंदाचे असेल.
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, नंतर सप्तम स्थानात भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – सहकारी आणि जोडीदाराचे सहकार्य लाभेल
आरोग्य – जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल
आर्थिक – व्यवसाय भागीदारीतून लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – वातावरण समाधानाचे असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र पंचमात नंतर षष्ठ स्थानात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – दिवासाचा पूर्वाध उत्तम आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करा
आरोग्य – उत्साह वाढेल, दुपारनंतर कंटाळवाणा दिवस जाणवणार आहे.
आर्थिक – व्यवहारात काळजी घ्या, कामदपत्रे नीट तपासा
कौटुंबीक वातावरण – कुरबुरी होण्याची शक्यता
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थात नंतर पंचमात भ्रमण, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याचे योग
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – संधीचा फायदा घ्या.
कौटुंबीक वातावरण – खुशखबर मिळाल्याने घरात आनंदी वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात नंतर चतुर्थ स्थानात भ्रमण, पंचमात राहू, चतुर्थात शनी
आजचा दिवस – घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल
आरोग्य – कटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – घरासाठी खर्च होतील, अनावश्यक खर्च टाळा
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, नंतर तृतीय स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – मानसन्मान मिळण्याचे योग
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे.
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
कौटुंबीक वातावरण – कुटंबात खेळीमेळीचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात नंतर द्वितीय स्थानात भ्रमण, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – चांगल्या आर्थिक संधी मिळण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास आणि उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – दिवस समाधानात जाणार आहे.
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात,नंतर प्रथम स्थानात भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – दुपारपर्यंत अनावश्यक खर्च टाळावे.
आरोग्य – बऱ्याच दिवसापासून असलेली मरगळ दूर होणार आहे.
आर्थिक – आर्थिक संधी दृष्टीस येतील.
कौटुंबीक वातावरण – दुपारनंतर दिवस प्रसन्नतेत जाणार आहे.
मीन
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात,नंतर व्यय स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – दुपरानंतर खर्च वाढण्याची शक्यता
आरोग्य – आजारपण कमी होण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत.
कौटुंबीक वातावरण – दुपारनंतर संयमाने आणि शांततेने वागावे लागेल.