Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन कृष्ण एकादशी
वार -मंगळवार
नक्षत्र – श्रवण
योग – शिव
करण – बव
राशी – मकर

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – कामाचा व्याप वाढण्याची शक्यता, सहकार्य मिळेल.
आरोग्य – कोणतीही समस्या जाणावणार नाही.
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल, त्याचा फायदा होईल.
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल.

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – नशिबाची चांगली साथ लाभेल, संधीचा फायदा घ्या.
आरोग्य – अतिउत्साहाने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
आर्थिक – पुर्वीच्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – संघर्ष, मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य – नैराश्य, अस्वस्थता जाणवण्याची शक्यता
आर्थिक – संपत्तीतून लाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – संयम आणि मनःशांती ठेवत भांडणे टाळा.

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – कुटुंबीय, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
आर्थिक – व्यवसाय, भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – सहकार्य आणि सामंजस्यामुळे प्रसन्नता जाणवेल.

सिंह

ग्रहस्थिती – चंद्राचे षष्ठ स्थानात भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता
आरोग्य – नैराश्य आणि एकटेपण जाणवण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत.
कौटुंबीक वातावरण – कुरबुरी होण्याची शक्यता

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचमात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे.
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – मुलांमुळे घरात प्रसन्नता राहणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्राचे चतुर्थात भ्रमण, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – घरासाठी खरेदीचे योग
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळण्याकडे लक्ष द्या
कौटुंबीक वातावरण – घरासाठी वेळ दिल्यास दिवस समाधानात जाणार आहे.

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्राचे तृतीय स्थानात भ्रमण, पंचमात राहू, चतुर्थात शनी
आजचा दिवस – मानसन्मान आणि प्रभाव वाढवणार दिवस
आरोग्य – सामाजिक क्षेत्रात वावरताना तब्येतीची काळजी घ्यावी
आर्थिक – जुणे येणे वसूल होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – भावंडांशी वादविवाद, मतभेद टाळण्याची गरज आहे.

धनु

ग्रहस्थिती – चंद्राचे द्वितीय स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – सकारात्मकता वाढवत शुभसंकेत मिळण्याची शक्यता
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे.
आर्थिक – गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी चांगला दिवस
कौटुंबीक वातावरण – कुटंबीयांचे सहकार्य मिळणार आहे.

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – मरगळ झटकून कामाकडे लक्ष द्यावे
आरोग्य – नैराश्य टाळण्यासाठी मेडिटेशन करण्याची गरज
आर्थिक – आर्थिक संधी किंवा नवे प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – चिडचीड आणि राग टाळण्यास दिवस शांततेत जाणार आहे.

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्राचे व्यय स्थानात भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता
आरोग्य – उत्साह कमी होण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत.
कौटुंबीक वातावरण – विनाकारण वादविवाद टाळा

मीन

ग्रहस्थिती – चंद्राचे आय स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता
आरोग्य – प्रदूषणात आणि उन्हात जाणे टाळा.
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – सकारात्मक गोष्टी घडत असल्याने समाधान लाभणार आहे.