
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन कृष्ण दशमी
वार -सोमवार
नक्षत्र – उत्तराषाढा
योग – परिघ
करण – वाणिज
राशी – धनु, सकाळी 10.25 नंतर मकर
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्यात, नंतर कर्मस्थानात, राहू व्ययात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – नशिबाची साथ असेल, कामे मार्गी लागतील
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वासाचा दिवस
आर्थिक – बढती, बदलीचे योग
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल.
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टमात, नंतर भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी कार्यस्थानात
आजचा दिवस – दुपारपर्यंत प्रकृतीची काळजी घ्या, नंतर दिवस सकारात्मक
आरोग्य – काही प्रमाणात थकवा जाणवू शकतो. अति दगदग, धावपळ टाळा
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – कुरबुरी जाणवण्याची शक्यता
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तमात नंतर अष्टमात, कर्म स्थानात राहू, भाग्यात शनी
आजचा दिवस – संमिश्र असेल, वादाविवाद टाळा
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा, प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – संपत्तीचे जुने वाद मिटण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – संयम ठेवल्या समाधान मिळेल.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठात नंतर सप्तमात भ्रमण, भाग्यात राहू, अष्टमात शनी
आजचा दिवस – शुभता वाढवणारा दिवस
आरोग्य – दुपारनंतर उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
आर्थिक – प्रयत्न केल्यास जुने येणे वसूल होईल
कौटुंबीक वातावरण – मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचमात, नंतर षष्ठात भ्रमण, अष्टमात राहू, सप्तमात शनी
आजचा दिवस – दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करा.
आरोग्य – दुपारनंतर नैराश्य आणि एकटेपण जाणवण्याची शक्यता
आर्थिक – व्यवसाय भागीदारीत फायद्याचे योग
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराशी मतभेद टाळा
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थात, नंतर पंचमात भ्रमण, सप्तमात राहू, षष्ठात शमी
आजचा दिवस – कुटुंबासाठी खरेदीचे योग, शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – प्रृकृतीत सुधारणा होण्याचे योग
आर्थिक – आधी केलेल्या कामातून लाभाचे योग आहेत
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीयात, नंतर चतुर्थात भ्रमण, षष्ठात राहू, पंचमात शनी
आजचा दिवस – मानसन्मान आणि मनःशाती मिळवून देणार दिवस
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – नशिबाची साथ असल्याने लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – घरासाठी वेळ दिल्यास आनंदी वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात नंतर तृतीय स्थानात भ्रमण
आजचा दिवस – सकारात्मकता वाढवणार दिवस
आरोग्य – सामाजिक कार्यात सहभागी होताना तब्येतीची काळजी घ्यावी
आर्थिक – धार्मिक, सामाजिक कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – कुटुंबात उत्साह राहणार आहे.
धनु
ग्रहस्थिती – प्रथमात चंद्र, नंतर द्वितीय स्थानात भ्रमण, राहू चतुर्थात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – सकारात्मकता आणि शुभसंकेच देणारा दिवस
आरोग्य – दुपारनंतर धावपळ-दगदग टाळावी, स्वतः ला कामात अडकवू नये.
आर्थिक – दुपारनंतर लाभाचे योग
कौटुंबीक वातावरण – कुटंबीयांचे सहकार्य मिळणार आहे.
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, नंतर प्रथमात भ्रमण, राहू तृतीय स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – दुपारपर्यत मरगळ जाणवणार आहे, त्यानंतर कामे करण्याचा उत्साह असेल
आरोग्य – अंगदुखी आणि डोळ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे
आर्थिक – दुपापर्यंत आर्थिक व्यवहार टाळावेत.
कौटुंबीक वातावरण – वादविवाद टाळण्यास घरात समाधानाचे वातावरण असेल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, नंतर व्यय स्थानात भ्रमण, राहू द्वितीय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – वाढत्या खर्चामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता
आरोग्य – आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता
आर्थिक – विनाकारण खर्च टाळल्यास फायदा होईल
कौटुंबीक वातावरण – चिडचीड आणि रागावर नियंत्रण ठेवा
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, नंतर आय स्थानात भ्रमण, राहू प्रथम स्थानात, शनी व्यय स्थानात
आजचा दिवस – लाभदायक दिवस ठरण्याची शक्यता
आरोग्य – कुटुंबातील सदस्यांचा प्रकृतीवर खर्च होण्याची शक्यता
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबीक वातावरण – मित्रपरिवार नातलगांच्या भेटीगाठीचे योग आहेत.