Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन कृष्ण सप्तमी
वार -शुक्रवार
नक्षत्र – ज्येष्ठा
योग – सिद्धी
करण – विष्टि
राशी – वृश्चिक, रात्री 25.46 नंतर धनु

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मकतेकडे जाणारा आहे. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी होणार असली तरी दुपारनंतर उत्साह वाढणार आहे. चंद्र अष्टम स्थानातून भाग्य स्थानात जात असल्याने नशिबाची चांगली साथही मिळणार आहे. मात्र, सुरुवातीचा दिवस संयमाने घालवण्याची गरज आहे. मनातील मरगळ दूर होत आत्मविश्वास निर्माण होणार आहे. आर्थिक दृष्टीनेही आता चांगला काळ सुरू होत आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस समाधानकारक राहणार आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थआनात होणार असल्याने दिवसभरात महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. अन्यथा ती रखडू शकतात. सहकाऱ्यांची मदत घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. आत्मविश्वास, उत्साह आणि मिळणाऱ्या सहकार्यामुळे मनावरील ताण कमी होणार आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने आजच्या दिवसात नवे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

मिथुन

मिथुन राशीला आजचा दिवस संयमाने वागावे लागणार आहे. चंद्र षष्ठ स्थानातून सप्तम स्थानात जास्त असल्याने आता वातावरण तुमच्यासाठी अनूकूल होणार आहे. मात्र, त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. सायंकाळनंतर कामातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. हितशत्रूंच्या कुरबुरीमुळे तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार असला तरी त्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी मनासारखी कामे होणार आहेत. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवसात धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे. धावपळीत महत्त्वाची कामे मागे राहणार नाहीत,याची काळजी घेण्याची गरज आहे. चंद्र पंचमातून षष्ठ स्थानात जात असल्याने प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि पथ्थपाणी सांभाळावे. स्पर्धा परीक्षांसाठी चांगला काळ आहे. तसेच हितशत्रूंवर मात करण्यात यश मिळणार आहे. चांगला काळ सुरू असल्यानेअनेक कामे मार्गी लागणार आहेत. तसेच विनाकारण मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. आर्थिकदृष्या आजाच दिवस सकारात्मक आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे. चंद्र चतुर्थातून पंचमात जात असल्याने घरासाठी केलेल्या खरदीचे समाधान मिळणार आहे. मात्र, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. केलेल्या चांगल्या कामाचे आता फळ मिळणार आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे शुभ परिणाम मिळणार आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. गुरु कर्म स्थानात असल्याने कार्यक्षेत्रात प्रभाव कायम राहणार आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस कौटुंबिक सुखसमाधानाचा आहे. आज घरातील प्रसन्न वातावरणाचा आनंद मिळणार आहे. चंद्र तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात जात असल्याने घराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रातही महत्त्वाच्या कामात नशिबाची साथही मिळणार आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे लाभदायक घटना घडण्याचे योग आहेत. त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस मानसन्माचा आणि प्रसन्नतेचा आहे. सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात आता मनासारख्या गोष्टी घडण्यास सुरुवात होत आहे. उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार असल्याने कामे झपाट्याने मार्गी लागणार आहेत. चंद्र द्वितीय स्थानातून तृतीय स्थआनात जात असल्याने प्रसिद्धईचे योग असून सामाजिक क्षेत्रात फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीबाबतचे वाद सुटणार असल्याने आजचा दिवस लाभाचा ठरण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीने आजचा दिवस आत्मविश्वासाचा आणि आर्थिक लाभाचा आहे. तुम्ही उत्साहाने आठवड्यातील रखडेलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहात. त्यामुळे कामाचा व्याप वाढला तरी त्याचा फायदा होणार आहे. कामाचा उरक झाल्याने पुढील काळात त्रास जाणवणार नाही. तसेच सायंकाळनंतर अनुकूलता अधिक वाढणार आहे. त्यामुळे जुणे उधार उसनवारी वसूल होणार आहे. तसेच संकटातून मार्ग सापडण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यात यश मिळणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे. सायंकाळपर्यंत दिवस रटाळ आणि कंटाळवाणा वाटणार आहे. मात्र, त्यानंतर आत्मविश्वास आणि उत्साह वाढणार आहे. गरजेच्या कामासाठी खर्च होणार असल्याने त्यावर फारसा विचार करणे टाळा. चंद्र व्यय स्थानातून प्रथम स्थानात येत असल्याने त्याचा फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांता तुमचा उत्साह दिसणार आहे. योग्य नियोजन करत कामे केल्यास सायंकाळनंतर दिवसाचा आनंद घेता येणार आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस सावधतेने राहण्याचा आहे. तसेच संधीचा फायदा घेतल्यास लाभदायक आहे. आय स्थानातून चंद्राचे व्यय स्थानात भ्रमण होणार आहे. त्यामुळे आर्थिक आवक झाली तरी खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकीबाबतचे निर्णय पुढे ढकलणे फायद्याचे ठरणार आहे. व्यय स्थानात चंद्र आल्याने अस्वस्थता, नैराश्य वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत अनुकूल काळ असताना महत्त्वाची कामे करून घ्यावी. तसेच नव्या योजनांतून मिळणाऱ्या संधीचा विचार करण्याची गरज आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात कमाचा ताण वाढला होता. आता त्याचे चांगले फळ मिळणार आहे. केलेल्या कामाचे कार्यक्षेत्रात कौतुक होणार आहे. त्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. चंद्र कर्म स्थानातून आय स्थानात येत असल्याने केलेल्या कामातून चांगला लाभ मिळणार आहे. बदली,बढतीसाठी प्रयत्न केल्यास त्याचाही फायदा होणार आहे. दिवसभराच अनुकूलता वाढणार असल्याने आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस कामाचा ताण वाढवणारा ठरणार आहे. मात्र, अनेक कामात नशिबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत नशिबाची चांगली साथ मिळणार असल्याने दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावी. व्यवसाय वाढीसाठी केलेल्या प्रयत्न यशश्वी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातील आणि व्यवसायातीलव संकटांवर मार्ग सापडणार असल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे.