
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन कृष्ण षष्ठी
वार – गुरुवार
नक्षत्र – अनुराधा
योग – वज्र
करण – गरज
राशी – वृश्चिक
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. चंद्र अष्टम स्थानात जात असल्याने प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. जास्त दगदगीमुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. विनाकारण मनात अस्वस्थता येण्याची शक्यता आहे. आर्थिव वाद असल्यास चर्चेने सोडवण्यास प्राधान्य द्यावे, त्याचा फायदा होणार आहे. मात्र, एकादश स्थानात शनि आणि द्वितीय स्थानात गुरु असल्याने आर्थिक अडचण जाणवणार नाही.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंबाकडून आणि सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. आत्मविश्वास, उत्साह आणि मिळणाऱ्या सहकार्यामुळे मनावरील ताण कमी होणार आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने व्यवसायवाढीसाठी चांगला काळ आहे. सर्व सहकाऱ्यांची मदत घेत कामे मार्गी लावण्यावर भर दिल्यास कामाचे समाधान मिळणार आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. मात्र, आलेला पैशांची गुंतवणूक केल्यास आगमी काळात त्याचा फायदा होणार आहे. प्रथम स्थानात गुरुमुळे दिवस सकारात्मक वातावरणात जाणार आहे.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. चंद्र षष्ठात असल्याने कामातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मार्गी लागलेली कामे ऱखडत असल्याने अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. तसेच चंद्र शत्रू स्थानात असल्याने ताणतणाव वाढण्याची आणि मनस्ताप होण्याची शक्यता आहे दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यस्थळी तुमचा चांगला प्रभाव वाढत असल्याने मनासारखी कामे होणार आहेत. भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक चांगल्या गोष्टी जुळून येणार आहेत.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवसात शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. आता चांगला काळ असून त्याचा चांगला फायदा करून घेण्याचा काळ आहे. कोणतीही निवीन गोष्ट शिकण्यासाठी चांगला काळ आहे. शनीचा प्रभाव कमी होत असल्याने अनेक कामे मार्गी लागणार आहेत. तसेच विनाकारण मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. भाग्य स्थानात राहू असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. आय स्थानात गुरु असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने गृहखरेदी आणि वाहनखरेदीचे योग तयार होत आहे. तसेच आजा आराम करण्याची इच्छा होण्याची शक्यता आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. चंद्राची दृष्टी कर्म स्थानावर असल्याने रखडल्याने कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. गुरु कर्म स्थानात असल्याने कार्यक्षेत्रावर प्रभाव निर्माण होणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढवणार आहे.चंद्र तृतीय स्थानात असल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत. तसेच संयमाने कामे केल्यास नशिबाची साथही मिळणार आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने लाभदायक घटना घडण्याचे योग आहेत. त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे. सप्तम स्थानात राहू असल्याने व्यवसायात करार करताना सावध राहण्याची गरज आहे. शनी षष्ठ स्थानात असल्याने स्पर्धापरीक्षांसाठी हा काळ चांगला आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. आता मनासारख्या गोष्टी होण्यास सुरुवात होत आहे. उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार असल्याने कामे झपाट्याने मार्गी लागणार आहेत. चंद्र द्वितीय स्थानात असल्याने धनलाभाचे योग असून काही फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही कामात अतिआत्मविश्वास टाळण्याची गरज आहे. दशम स्थानात गुरु असल्याने अनेक कार्यक्षेत्रात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. संपत्तीबाबतचे वाद सुटणार असल्याने आजचा दिवस लाभाचा ठरण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीने आजचा दिवस शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. मनाकारखी कामे होत असल्याने मनस्ताप कमी होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. उत्साहाच्या भरात कोणतेही काम स्वतःवर ओढवून घेऊ नका. शनीचा प्रभाव कमी होत असल्याने संकटातून मार्ग सापडणार आहेत. शनीच्या राशीपरिवर्तनानंतर आता चांगले दिवस सुरू होणार असल्याने मनात सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे. चंद्र स्थानात असल्याने पैशांची चणचण जाणवणार आहे. कार्यक्षेत्रात प्रभाव राहणार आहे. या काळात महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलण्याची गरज आहे. मनावर विनाकारण दडपण येण्याची शक्यता आहे. कामे संथ गतीने होत असल्याने मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. चतुर्थ स्थानात राहूमुळे घरात कुरबुरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवणे गरजेचे आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायक आहे. आय स्थानात चंद्र असल्याने लाभाचे योग तयार होत आहेत. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे. कर्म स्थानात शनी असल्याने कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. सहकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेतल्याने तुमचा ताण वाढणार नाही. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडांशी जुळवून घेत वादविवाद टाळावे. साडेसातीचा काळ संपत असल्याने नव्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस कामात झोकून द्यावे लागणार आहे. मात्र, तुमच्यात उत्साह आणि आत्मविश्वास असल्याने कामाचा ताण जावणार नाही. चंद्र कर्म स्थानात असल्याने कामाचे योग्य नियोजन करून पुढे जावे लागणार आहे. अन्यथा कमाचा ताण वाढत जाण्याची शक्यता आहे. गुरु सप्तम असल्याने व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ ठरणार आहे. तसेच अनेक कामात नशिबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवसापासून जाणवणारी मरगळ दूर होणार आहे. मात्र, धावपळ दगदग टाळणे गरजेचे आहे. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यावर भर द्यावा. संकटांवर मार्ग सापडणार असल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे.