Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – फाल्गुन पोर्णमा 12.25 पर्यंत, त्यानंतर फाल्गुन कृष्ण प्रतिप्रदा
वार – शुक्रवार
नक्षत्र – उत्तरा
योग – सूल
करण – बालव
राशी – सिंह, 12.56 नंतर कन्या

आज धुलिवंदन म्हणजेच धुळवड साजरी करण्यात येणार आहे.
पोर्णिमा 12.25 पर्यंत असल्याने तसेच हिंदुस्थानातून चंद्रग्रहण दिसणार नसल्याने वेधादि किंवा सूतककाळ पाळण्याची गरज नाही.

मेष

मेष राशीसाठी आजचा दुपारपर्यंतचा दिवस शुभ आहे. त्यामुळे धुळवडीचा आनंद घेता येणार आहे. दुपारपर्यंत पंचम स्थानात चंद्र असल्याने मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर चंद्र षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे धुळवडीच्या आनंदात विरजण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. विनाकारण वादविवाद टाळण्याची गरज आहे. मात्र, व्यय स्थानात राहू सणासाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. एकादश स्थानात शनि असल्याने आर्थिक आवक होण्याची शक्यता असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. दुपारनंतर चंद्र षष्ठ स्थानात गेल्यानंतर काहीप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे. धुळवडीच्या सणानिमित्त घरात आनंद आणि उत्साह असणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे.दुपारनंतर एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. दुपारपर्यंत चतुर्थ स्थानात चंद्र असल्याने ठरलेल्या कामात कुटुंबीयांची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर घरातील बच्चे कंपनीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आय स्थानात राहू असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. प्रथम स्थानात गुरुमुळे नशिबाची चांगली साथ मिळणार आहे.

मिथुन

मिथुन राशीला आज दुपारनंतर घरातील कामांचा व्याप सांभाळावा लागणार आहे. दुपारपर्यंत तृतीय स्थानात चंद्र असल्याने अचानक मित्र किंवा नातलगांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. धुळवडीच्या सणानिमित्त उत्साह वाढणार आहे. दुपारनंतर चंद्र चतुर्थ स्थानात जात असल्याने घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे चिडचीड होण्याची शक्यता आहे. दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. कार्यस्थळी तुमचा चांगला प्रभाव असल्याने मनासारखी कामे होणार आहेत. भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक चांगल्या गोष्टी जुळून येणार आहेत.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आणि सकारात्मक आहे. दुपारपर्यंत द्वितीय स्थानात चंद्र असल्याने पैशांशी संबंधित व्यवहार दुपारपर्यंत पूर्ण करावेत.त्यानंतर त्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. कोणत्याही खरेदीत किंवा महत्त्वाच्या कामात कुटुंबियांचे सहकार्य मिळणार आहे. दुपारनंतर अनेक कामे मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. होळीनिमित्त तुमच्या राशीचा शुभकाळ सुरू झाला आहे. त्याचा चांगला फायदा करून घेण्याचा काळ आहे. विनाकारण मनावर आलेले दडपण दूर होणार आहे. भाग्य स्थानात राहू असल्याने कोणाशीही वादविवाद टाळण्यास नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मात्र,आता लवकरच शनी भाग्य स्थानात संक्रमण करणार असल्याने अडीचीमध्ये आलेल्या अडचणी कमी होणार आहेत.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आज दिवस अनपेक्षित लाभाचा आहे. दुपारपर्यंत प्रथम स्थानातील चंद्रामुळे आत्मविश्वासात वाढ होणार आहे.तसेच दुपारनंतर चंद्र द्वितीय स्थानात जात असल्याने धनलाभाचे योग तयार होत आहेत. त्याचा फायदा करून घेण्याची गरज आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. खर्च वाढत असले तरी त्याप्रमाणा आवक होणार असल्याने समाधान लाभणार आहे. तुमच्या राशीतच चंद्रग्रहण होत असल्याने मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. मात्र, ते दूर सारून दिवसाचा आनंद घेत धुळवड साजरी करण्याकडे लक्ष द्यावे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांचा आज दिवस संमिश्र आहे. दुपारपर्यंत खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दुपारपर्यंत व्यय स्थानात चंद्र असल्याने अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चंद्र प्रथम स्थानात येणार असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे. गुंतवणुकीबाबतचे निर्णय काही दिवस पुढे ढकलावे. भाग्य स्थानात गुरु असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, सप्तम स्थानात राहू असल्याने व्यवसायात तोटा होणार नाही, याची काळजी घ्यावी. षष्ठ स्थानात शनीचा प्रभाव कमी होत आहे. त्याचाही फायदा होणार आहे. चंद्राच्या राशीपरिवर्तानामुळे मन प्रसन्न राहणार असल्याने दिवस समाधानात घालवता येणार आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस मनासारखा घालवता येणार आहे. दुपारपर्यंत आय स्थानात चंद्र असल्याने जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे दिवस आहेत. मात्र, दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दशम स्थानात गुरु असल्याने अनेक कार्यक्षेत्रात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. षष्ठ स्थानात राहू असल्याने हितशत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. मात्र, बुद्धीचातुर्याने त्यावर मात करणे शक्य होणार आहे. गुतंवणुकीसाठी चांगला काळ आहे. कार्यक्षेत्रात नवे प्रकल्प हाती आल्याने त्यातून चांगला फायदा होणार आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीने आजचा दिवस कामाचा व्याप वाढवणारा असला तरी धनलाभाचे योग आहेत. नशीबाचीही चांगली साथ मिळणार आहे. दुपारपर्यंत कर्म स्थानात चंद्र असल्याने कामे उरकून घेतल्यास नंतर ताण येणार नाही. कर्म स्थानातील चंद्रामुळे अचानक लहान प्रवासाचा बेत ठरण्याची शक्यता आहे. त्याचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होणार आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. शनीची अडीची संपत आल्याने संकटातून मार्ग सापडणार आहेत. दुपारनंतर धनलाभाचे योग असल्याने उधरउसनवार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस नशीबाची चांगली साथ मिळणार असली तरी कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत भाग्य स्थानात चंद्र असल्याने हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. त्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी जास्त महनत घ्यावी लागणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची चांगली साथ मिळणार आहे. नशिबाची चांगली साथ असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. दुपारपर्यंत भाग्य स्थानातील चंद्रामुळे कठीण कामेही लवकरच पूर्ण करता येणार आहेत. चतुर्थ स्थानात राहूमुळे घरात भांडणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.शनीची चांगली साथ मिळणार असली तरी षष्ठ स्थानातील गुरुमुळे काहीजण कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज प्रकृतीकडे लक्ष देत काम केल्यास नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. दुपारपर्यंत चंद्र अष्टम स्थानात असल्याने थकवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर केलेल्या जुन्या कामातून चांगला फायदा मिळणार आहे. तसेच जुनी गुंतवणूक फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या चांगल्या संधी आता मिळण्याचे योग आहेत. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. द्वितीय स्थानातील शनीमुळे चांगले आर्थिक पाठबळ मिळणार आहे. साडेसातीचा काळ संपत असल्याने नव्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र असणार आहे. चंद्र सप्तम स्थानातून अष्टम स्थानात जात असल्याने तसेच प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सण असला तरी पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. गुरुही सप्तम असल्याने जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच भागीदारी किंवा व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच संपत्तीबाबत असलेले वादविाद संपण्याची शक्यता आहे. आता साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू होणार असल्याने अनेक अडचणी कमी होणार आहेत. तसेच आधी केलेल्या चांगल्या कामांचे फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस दुपरापर्यंत सावध राहण्याची गरज आहे. मनावर संयम ठेवल्यास वादविवाद टाळणे शक्य आहे. षष्ठ स्थानात चंद्र असल्याने हितशत्रू कारवाया करण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर त्याचा त्रास जाणावणार नाही. तसेच व्यवसायातील संकटांवर मार्ग सापडणार आहेत. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र, गुंतवणुकीबाबतचे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्याची गरज आहे. आता लवकरच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने सावध राहून कोणतेही व्यवहार करण्याची गरज आहे.