Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

आजचे पंचाग

तिथी – चैत्र शुद्ध चतुर्थी
वार -मंगळवार
नक्षत्र – भरणी
योग – विष्कंभ, प्रीती
करण – वाणिज
राशी – मेष, 4.30 नंतर वृषभ

आज अंगारक विनायक चतुर्थी आहे.

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, त्यानंतर द्वितीय स्थानात भ्रमण, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – सकारात्मकता आणि उत्साह वाढवणार दिवस
आरोग्य – चांगले राहणार आहे
आर्थिक – हाती असलेल्या पैशांची गुंतवणूक करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल.

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात नंतर प्रथम स्थानात भ्रमण, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – दिवसाच्या पूर्वार्धात अनावश्यक खर्च टाळा
आरोग्य – दिवसाच्या उतरार्धात उत्साह वाढणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय दुपारनंतर घ्या
कौटुंबीक वातावरण – दुपारपर्यंत वावदविवाद टाळा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, नंतर व्यय स्थानात भ्रमण, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – दुपारनंतर वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
आरोग्य – डोळेदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो
आर्थिक – महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – घरातील वातावरण आनंदी असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात,नंतर आय स्थानात भ्रमण, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – कार्यक्षेत्रातील वातावरण उत्साही राहणार आहे
आरोग्य – अतिताण आणि दगदग टाळा
आर्थिक – केलेल्या कामांचा चांगला फायदा होणार आहे
कौटुंबीक वातावरण – एखादा शुभ समाचार मिळाल्याने घरात आनंदी वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, नंतर कर्म स्थानात भ्रमण, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – दुपारपर्यंत नशिबाची चांगली साथ मिळणार आहे, नंतर कामाचा व्याप वाढेल
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेच वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, नंतर भाग्य स्थानात भ्रमण, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – दिवसाच्या पूर्वार्ध संयमाने वागा, नंतरचा दिवस सकारात्मक
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात उत्साह जाणवेल
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता
कौटुंबीक वातावरण – भावंडांशी वाद टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात,नंतर अष्टम स्थानात भ्रमण, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – दिवसाच्या उत्तरार्धात वादविवादाची शक्यता
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबीक वातावरण – संयमाने वागा, मतभेद टाळा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, नंतर सप्तम स्थानात भ्रमण, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – दिवसाचा उत्तरार्ध फायद्याचा असेल
आरोग्य – मनावर दडपण दूर होण्याची शक्यता
आर्थिक – व्यवसाय, भआगीदारीतून फायद्याचे योग
कौटुंबीक वातावरण – जोडीदाराशी वादविवाद टाळा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात,नंतर षष्ठ स्थानात भ्रमण, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करा
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज
आर्थिक – कर्ज आणि आर्थिक देवाण- घेवाण टाळा
कौटुंबीक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस समाधानाचा असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात,नंतर पंचम स्थानात भ्रमण, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे
आरोग्य – मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक योजना, जमा-खर्चाचे नियोजन करा
कौटुंबीक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात,नंतर चतुर्थ स्थानात भ्रमण, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – जुन्या पोटदुखीच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – घरासाठी खर्च करावा लागू शकतो.
कौटुंबीक वातावरण – घरातील कुरबुरी टाळल्यास दिवस समाधानाचा असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात,नंतर तृतीय स्थानात भ्रमण, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आर्थिक लाभ आणि मानसन्मानाचे योग आहेत
आरोग्य – उन्हात जाणे टाळण्याची गरज
आर्थिक – संपत्तीबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस
कौटुंबीक वातावरण – भावंडांचे सहकार्य मिळणार आहे.