हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू, प्रसिद्ध गिटारवादक आणि अनुभवी अॅक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके (78) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
तब्बल सहा दशके किरण फाळके डोंबिवलीत वास्तव्य करत होते. अत्यंत स्वच्छंदी आणि हसतमुख स्वभावाचे असलेल्या फाळके यांनी अनेक वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांना अॅक्युपंक्चर शास्त्राचा सखोल अनुभव होता आणि गेली 35 वर्षे ते गरजूंना मोफत उपचार देत होते. त्यांच्या अनुभवातून भिवंडी येथील एका महाविद्यालयात नुकतीच त्यांची प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली होती. किरण फाळके (78) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.