हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त शिवतीर्थावर गर्दीचा महासागर उसळला. शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, लहान मुले, दिव्यांग, वृद्ध यांच्यासह राजकीय, सामाजिक, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
ठाणे, पालघर, रायगडात शिवसेनाप्रमुखांना आदरांजली
लाखो मराठी माणसांच्या मनात अभिमानाची ज्योत सतत तेवत ठेवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठाणे, रायगड, पालघर जिह्यातील शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदरांजली वाहिली. विविध ठिकाणी त्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
स्मृतिस्थळावर लहान मोठय़ांनी गर्दी केली होती. चिमुरडीने फुले वाहून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुस्लीम कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विद्याविहार पश्चिम येथील किरोळगावमधील समर्थ प्रेरणा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश वाणी, स्वाती पाटील, विलास लिंगाडे, नरेंद्र सावंत, गणेश परब, चंद्रकांत हळदणकर, रमेश कुलेकर उपस्थित होते.
खोपोलीमधील रमाधाम वृद्धाश्रमाचे चंदूमामा वैद्य यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
शिवसेनेचे आंदोलन असो, मोर्चा असो की दसऱयाची सभा असो माहीमला राहणारे 77 वर्षांचे प्रकाश तोडणकर मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. हातातील छोटी तुतारी वाजवत शिवसेनेला पाठिंबा देतात.
दि दांगट न्यूज पेपर एजन्सीचे मुख्य वितरक बाजीराव दांगट आणि त्यांचे पुत्र चारुदत्त दांगट यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.