
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभुमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही भाषण होणार होते. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे भाषण ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण होणार होते. पण ऐनवेळी या दोघांचे भाषण कार्यक्रमातून वगळण्यात आले. या कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. या घटनेमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाराज झाल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
या घटनेनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालयाने राज्य शिष्टाचार विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपमुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.