हेलेन चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. या वादळाच्या परिणामांमुळे हजारो लोक बेघर झाल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, जॉन चक्रीवादळाने मेक्सिकोमध्ये कहर केला आहे. शनिवारी नैऋत्य मॅक्सिकोतील हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली. या चक्रीवादळामुळे अमेरिकेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या 6 ते 7 दिवसांपासून या वादळाचा प्रभाव अमेरिकेत दिसून येत असून, त्यात सुमारे 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
‘जॉन’ चक्रीवादळाचा सर्वात वाईट परिणाम मॅक्सिकोतील गुरेरो येथे दिसून आला. या चक्रीवादळामुळे गुरेरो येथील 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेत मोठा विध्वंस झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा फ्लोरिडाच्या ग्रामीण बिग बेंड भागातील विरळ लोकवस्ती असलेल्या भागात या वादळाचा वेग 225 किलोमीटर प्रति तास होता. या वादळात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेलेन चक्रीवादळामुळे देशभरात 2 लाख 51 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोच्या आखातातून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर धडकणारे हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ ठरले आहे. हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक वादळांपैकी एक आहे. याआधी शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 1 कोटी 20 लाख लोकांना वादळाचा फटका बसला आहे.
अमेरिकेतील या विध्वंस परिस्थितीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि लोकांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. आमचे लक्ष लोकांचे प्राण वाचवण्यावर आहे. मी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. हेलनच्या आगमनापूर्वी माझे प्रशासन फ्लोरिडा, जॉर्जिया, अलाबामा, दक्षिण कॅरोलिना, नॉर्थ कॅरोलिना आणि टेनेसी येथील लोकांच्या संपर्कात होते. हे वादळ निघून गेल्यानंतरही आम्ही त्यांच्या सोबत असू आणि त्यांना सावरण्यास मदत करू. असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.