प्रचंड वेगाने आज धडकणार फेंगल वादळ, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

तामीळनाडूसह अनेक राज्यांना फेंगल या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आज प्रचंड वेगाने धडकणार असून अनेक भागात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा परिणाम जाणवणार नसून किनारी भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपुरमदरम्यान जाणवू शकतो. या काळात वारे ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तर 20 आणि 40 नोव्हेंबर रोजी तामीळनाडू आणि पुदुच्चेरी येथे अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.