सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा कहर केला आहे. बनावट अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक करणे त्यांच्यासाठी साधारण गोष्ट आहे. त्यात प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून फसवणूक सर्रासपणे केली जात असताना आता थेट राष्ट्रपतींच्या नावाने बनावट अकाऊंट सुरू करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. रांची पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप त्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, झारखंडच्या हजारीबाग निवासी फेसबूक युजर मंटू सोनी याला राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या बनावट अकाऊंटवरून नुकतीच फ्रेंड रिक्वेस्ट आली. जय हिंद, तुम्ही कसे आहात. मग प्रोफाईलमागे असलेल्या स्कॅमर म्हणाला, मी फेसबुकचा फार कमी वापर करते. मला तुमच्या वॉट्सअॅप नंबर पाठवा. मंटूने आपला नंबर पाठवला. काही तासांनंतर फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज आला, आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे आणि तुम्हाला तुमचा व्हॉट्सॲप कोड पाठवला आहे, जो तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवला आहे. कृपया आम्हाला कोड लवकर पाठवा; तो 6 अंकी क्रमांक आहे.
यावेळी मंटूला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. त्यानंतर मंटूने राष्ट्रपती भवन, झारखंड पोलीस आणि इतरांना टॅग करत त्याचे तपशील ‘X’ वर शेअर केले. रांची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आणि फेसबुक पोस्टचा तपशील मागवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहोत. ते म्हणाले, “आम्ही एजन्सींना या प्रकरणातील सर्व तपशील तपासण्यास आणि सखोल तपास करण्यास सांगितले आहे.