आमिष दाखवून एक कोटीचा चुना, नकली वेबसाईटपासून सावध रहा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. असेच प्रकरण नोएडात घडले. एका व्यावसायिकाला जास्त परताव्याचे आमीष देऊन 1.15 कोटी रुपयांना फसवले. नकली वेबसाईटच्या माध्यमातून त्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि वारंवार पैसे जमा करण्यास सांगितले. नोएडा सेक्टर 44 मध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाला 27 जानेवारी रोजी एका महिलेचा कॉल आला. तिचे नाव ऋषिता असे तिने सांगितले. तिने व्यावसायिकाला काही नकली वेबसाईटच्या लिंक पाठवल्या. त्या थेट  m.catamarketss.com  वर रिडायरेस्ट व्हायच्या. या गुंतवणुकीत सुरुवातीला व्यावसायिकाला नफा झाला. त्याने एक लाख रुपये भरले. त्याला 15 हजार रुपये नफा झाला. त्यामुळे ते गुंतवणूक करत राहिले. त्यांनी वेगवेगळ्या अकाऊंटमधून 65 लाख रुपये गुंतवले. हळूहळू ही गुंतवणूक वाढवत 1.9 कोटी रुपये एवढी केली. जेव्हा dव्यावसायिकाने पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना 31.6 लाख रुपये कर भरण्यास सांगितला. तोही त्यांनी भरला. त्यानंतर 24 तासात त्यांना कर्न्वजन चार्ज म्हणून 18.6 लाख रुपये भरण्यास सांगितले.  मात्र तरीही त्यांना गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही. नफा देखील मिळाला नाही. या प्रकरणानंतर व्यावसायिकाने सायबर क्राईम पोलिसांत तक्रार दाखल केली.