![Samay Raina](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Samay-Raina-1-696x447.jpg)
इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये अश्लील टिप्पणीप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने या आठवड्यात दुसऱ्यांदा कॉमेडियन समय रैनाला समन्स बजावले आहे. तसेच सायबर सेलने समयला सोमवार (17 फेब्रुवारी रोजी) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
बुधवारी समय रैनाच्या वकिलाने सायबर सेलला सांगितले होते की, समय रैना सध्या अमेरिकेत आहे आणि 17 मार्च रोजी परत येईल. समन्सला उत्तर देण्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. याआधी बुधवारी समय रैनाने त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट शोबाबत सुरू असलेल्या वादात स्पष्टीकरण दिले होते. त्याने इंस्टाग्रामवर दावा केला की, त्याने त्याच्या शोचे सर्व व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकले आहेत. त्याने असेही म्हटले की, त्याचा हेतू फक्त लोकांना हसवणे हा होता.