
येत्या 30 एप्रिलपासून चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत 18 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केलीय. यात 60 टक्के ऑनलाईन, तर 40 टक्के ऑफलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. परंतु काही ठगांकडून ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे समन्वय केंद्राने एक अलर्ट जारी करत म्हटले आहे. बनावट वेबसाइट्स, जाहिरातींद्वारे बुकिंग करणाऱयापासून दूर रहावे, असे म्हटले आहे.