
ड्रग पार्सलच्या नावाखाली ईडी कारवाईची भीती दाखवून सायबर ठगाने निवृत्त शिक्षिकेची 1 कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जानेवारी महिन्यात त्यांना एका नंबरवरून फोन आला. ठगाने तो कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. महिलेचे म्युचल फंडाबाबत पेपर येणार असल्याने त्याने पार्सलबाबत चौकशी केली. तेव्हा ठगाने त्या पार्सलमध्ये ड्रग, पासपोर्ट, व्रेडिट कार्ड असल्याचे सांगत धमकावून 1 कोटी 72 लाखांची फसवणूक केली.