
सध्या घिबली स्टाईल इमेज करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. घिबली ट्रेंडचा मोह धोकादायक ठरू शकतो. आपली माहिती आपल्या चेहऱ्यासह डार्क वेबवर विकली जाऊ शकते, याबाबत सायबर तज्ञांनी सावध केले आहे. घिबली किंवा इतर इमेज तयार करताना आपला फोटो एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. म्हणजे एक प्रकारे बायोमेट्रिक माहिती आपण शेअर करत असतो. काही गोपनीय माहितीला फेस लॉक असते. आपण इमेजेस तयार करण्याच्या नादात गोपनीय माहिती गमावून बसू शकतो.
कोणीही फक्त फोटो वापरून एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन शोधू शकते. चोरीला गेलेला बायोमेट्रिक डेटा काळ्या बाजारात विकला आणि डार्क वेबवरदेखील विकला जाऊ शकतो. त्याचा वापर सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड किंवा डीपफेक गुह्यांसाठी केला जाऊ शकतो.