हॉटेलच्या बिलावरून ग्राहक आणि वेटरचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या ग्राहकांनी या वेटरला गाडीतून फरपटत नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी वेटरचे अपहरण करून त्याला मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये सखाराम मुंडे हा आपल्या दोन साथीदारांसह एका ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवल्यानंतर मुंडे याने वेटर शेख साहिलला बिल आणायला सांगिलते. त्यानंर मुंडे ऑनलाईन पेमेंटसाठी क्यु आर कोड स्कॅन करत होता. पण पेमेंट होण्यापूर्वीच मुंडे कारमधून पळून जातो. तेव्हा साहिल या तिघांचा पाठलाग करतो. साहिल त्यांना पकडण्यासाठी कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. पण मुंडे आणि त्याचे साथीदार साहिलला फरपटत घेऊन जातात.
मुंडे आणि साथीदाराने आपले अपहरण केले अशी माहिती वेटर साहिलने दिली. आपल्याला रात्रभर बांधून ठेवले, मारहाण केली इतकंच नाही तर आपल्याकडील साडे 11 हजार रुपयेही घेतले असेही साहिलने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी सखाराम मुंडे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.