
आयफोन 16 सीरीज नंतर आता अॅपल कंपनीने आयफोन 17 सीरीजच्या लाँचिंगची तयारी सुरू केली आहे. कंपनी सध्या आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्सवर जोरदार काम करत आहे. कंपनी या फोनमध्ये वेगवेगळे नवीन फीचर्स देण्याची तयारी करत आहे. आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्स या दोन फोनमध्ये 7.5 डब्ल्यू रिव्हर्स वायरलेस चार्जिंग देणार असून याची चाचणी केली जात आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्यास आयफोन यूजर्सला आयफोनवरून एअरपॉड्स आणि अॅपल वॉच चार्जिंग करण्याची सुविधा मिळेल. वायर्ड चार्जिंगचा वेग 35 डब्ल्यूवर बनवलेला असेल. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स असेल. याचाच अर्थ तिन्ही कॅमेरे वाइड, अल्ट्रा वाइड आणि टेलीफोटो सर्वच्या सर्व 48 मेगापिक्सलचे सेन्सरचे असतील.