
गेल्या सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेलय दंगलीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हिंसाचाराच्या या घटनेच्या दहा दिवसानंतर ही संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे.
कोतवली, तहसील, गणेश पेठ आणि यशोदानगर भागातल्या पोलीस ठाण्यासह 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. याआधी टप्याटप्याने काही भागातील संचारबंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज दुपरी 3 वाजल्यापासून हिंसाग्रस्त भागातील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे. दरम्यान, संचारबंदी उठवल्यानंतर हिंसाग्रस्त भागात रूट मार्च काढत पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.