काकडीचा वापर उन्हाळ्यात का आहे खूप गरजेचा! वाचा

काकडीचे स्लाइस (तुकडे) - काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते. काकडी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या काकडीच्या गोल चकत्या करून डोळ्यावर ठेवाव्यात. वीस मिनिटे डोळ्यांवर तसेच ठेवावे.

उन्हाळा आणि काकडी हे न तुटणारं समीकरण आहे. एरवी काकडीकडे बघून नाक मुरडणारे लोक, उन्हाळ्यात मात्र आहारामध्ये काकडीचा समावेश करतात. उन्हाळ्यामध्ये काकडी खाण्यामुळे, शरीर हाइड्रेट राहण्यासाठी मदत होते. काकडी खाणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच हितावह आहे.

  

उन्हाळ्यात आढळणारी काकडी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे देऊ शकते. काकडीत आढळणारे पोषक तत्व उन्हाळ्यातील उष्णता आणि निर्जलीकरणापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

 

काकडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि व्हिटॅमिन-सी, फॉलिक ऍसिड सारखे घटक असतात, जे शरीराला अनेक फायदे प्रदान करण्यात मदत करू शकतात.

 

काकडीपासून सलाड, रायता  असे विविधप्रकारे खाण्यात वापर करु शकतो. मुख्य म्हणजे,  उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा वापर पॅकच्या स्वरूपात केला जातो. पण त्याचा आहारात समावेश करून तुम्ही सन टॅन, कोरडी त्वचा इत्यादीपासून त्वचेचे संरक्षण करू शकता.


पिंपल्स केवळ तुमचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करत नाहीत. परंतु कधीकधी ते खूप वेदनादायक देखील असू शकतात.

 

आहारात काकडीचा समावेश केल्यास पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. काकडीत असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय काकडीत व्हिटॅमिन-सी आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे त्वचेला संसर्गापासून वाचवता येते. त्वचेवर पडलेल्या सुरकुत्याही काकडीच्या सेवनाने कमी होतात.

 

काकडी हा पाण्याचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात सुमारे ९० टक्के पाणी आढळते. याशिवाय त्यात असे अनेक गुणधर्म आढळतात, जे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)