उन्हाळ्यात काकडी खाल तर निरोगी राहाल.. वाचा काकडीचे आरोग्यासाठी भरपूर फायदे!!

उन्हाळ्यात आढळणारी काकडी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे देऊ शकते. काकडीत आढळणारे पोषक तत्व उन्हाळ्यात उष्णतेपासून आपले उत्तम संरक्षण करतात. काकडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि व्हिटॅमिन-सी, फॉलिक ऍसिड सारखे घटक असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. काकडीपासून आपण सलाड, कोशिंबीर यासारखे विविध पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. 
उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा वापर पॅकच्या स्वरूपात केला जातो. आहारात काकडीचा समावेश केल्यास पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. काकडीत असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय काकडीत व्हिटॅमिन-सी आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे त्वचेला संसर्गापासून वाचवता येते. त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या काकडीच्या सेवनाने कमी होतात.
काकडी हा पाण्याचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यात सुमारे ९० टक्के पाणी आढळते. याशिवाय त्यात असे अनेक गुणधर्म आढळतात, जे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
काकडी खाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. काकडीमध्ये मुबलक असलेल्या पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत होते. 
आहारामध्ये काकडीच्या नियमित सेवनामुळे, पक्षाघात आणि हृद्यविकाराचा झटका यासारखे धोके टाळण्यास मदत होते. काकडीमध्ये असलेल्या, मॅग्नेशिम आणि पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. काकडीतील कुकुरबीटामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते. काकडीमध्ये मुबलक व्हिटॅमिन के असल्यामुळे, काकडी ही हाडांसाठी सुद्धा खूप उपयुक्त मानली जाते. व्हिटॅमिन के हाडांच्या पुरेशा विकासासाठी गरजेचे असते. 
(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)