
चीनमधील एका कंपनीने कर्ज फेडण्यासाठी आपल्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले असून यात मगरींचा लिलावसुद्धा केला जात आहे. याची किंमत तब्बल 4.7 कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. गुआंग्डोंग प्रांतात असलेल्या या कंपनीकडे जवळपास 100 टन वजनाच्या मगरी आहेत. ही बोली 10 मार्चपासून सुरू करण्यात आली असून 9 मेपर्यंत सुरू राहणार आहे. एक महिना उलटल्यानंतरही याला अद्याप बोली लागली नाही.