Cristiano Ronaldo – हाडं गोठवणारी थंडी, रोनाल्डो उणे 20 डिग्री थंड पाण्यात उतरला

फुटबॉल जगतातील सितारा करोडो फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कुटुंबीयांसोबत लॅपलँडमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. खेळण्याच्या अलौकिक शैलीमुळे त्याचा जगभरात चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याने केलेली एखादी कृती चाहते सुद्धा तितक्याच आवडीने फॉलो करतात. असाच एक त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता वर्ग जगाच्या कानाकोपऱ्या पसरलेला आहे. त्यामुळे त्याने केलेली एखादी गोष्टी प्रचंड व्हायरल होते आणि त्याला एका ट्रेंडचे स्वरुप येते. चाहते सुद्धा त्याच्या कृतीचे कौतुक करून त्याला फॉलो करततात. पंरतु आता मात्र ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्वत:च एक ट्रेंड फॉलो करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या रोनाल्डो आपल्या कुटुंबासोबत फिनलँडच्या लॅपलँडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सध्या हाडं गोठवणारी थंडी लॅपलँडमध्ये पडली आहे. अशा या थंड वातावरणात उणे 20 डिग्री सेल्लिसय तापमानामध्ये थंड पाण्यात उतरण्याचा थरार ख्रस्तियानोने अनुभवला आहे. त्याने त्याचा हा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद केला असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्याला 93.1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आणि शेअर सुद्धा केले आहे.

सोशल मीडियावर अनेक ट्रेंड सुरू असतात. सध्या आईस बाथचा एक ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या ट्रेंडमध्ये थंड पाण्यात डुबकी घेऊन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला जातो. अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटींनी, खेळाडूंनी, नागरिकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. या ट्रेंडमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डेनेही अप्रत्यक्षपणे आपला सहभाग नोंदवला आहे असच म्हणाव लागेल.