नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ लखन अजित शेख यास एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली असून फिरोज शेख यास ताब्यात घेऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
फिरोज शेख याच्या विरुध्द नेवासा पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी (सोनसाखळी) दरोडा तयारी, दुखापत, चोरी घातक हत्यार कब्जात बाळगुन दहशत पसरवणे, अशा प्रकारचे 12 गुन्हे दाखल होते. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्याचे विरुध्द चौकशी पुर्ण करुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे कडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधीक्षकांनी जिल्हादंडाधिका-यांकडे हा पाठवला होता.
त्यांच्या आदेशानुसार फिरोज उर्फ लखन अजिज शेख, वय 30 वर्षे, रा.नेवासा फाटा ता.नेवासा यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केला, त्यानुसार नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी दिनांक 14 जुलै रोजी ताब्यात घेवून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.