निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयाची माहिती मागवली होती. मात्र छत्रपती संभाजी नगर जिह्यातील 28 शाळांनी शिक्षकांची माहिती दिली नाही. या शाळांच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत सिल्लोड आणि छत्रपती संभाजी नगर येथील मुख्याध्यापकांविरोधात कारवाई झाल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी आम्हाला कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे गटशिक्षण अधिकारी गुन्हे दाखल करत आहेत, असे जयश्री चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान, गुन्हे दाखल झालेल्या शाळांमधील तब्बल 25 शाळा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थांशी संबंधित आहेत. मुख्याध्यापक निवडणूक आयोगाकडे माहिती अपलोड करण्यास तयार होते. मात्र, माहिती अपलोड करू नये, म्हणून संस्थाचालकांनीच त्यांना सूचना केल्या. त्यामुळे आता गुन्हे दाखल होऊन नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही मुख्याध्यापक म्हणत आहेत.