Crime News – मित्राच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

पत्नीने मित्राच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पती बेपत्ता असल्याची पत्नीने तक्रार पोलिसात दाखल केली. तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तपासाची चव्रे फिरवली. कसून चौकशी केल्यानंतर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. हत्याप्रकरणी दोघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.