बलात्काराच्या घटनांनी देश हादरून गेला आहे. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात गाजत आहे. असे असतानाच आता तेलंगणामध्ये विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका रिक्षामध्ये सदर महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.
सदर घटना तेलंगणातील निर्मल जिल्ह्यामध्ये घडली आहे. पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. शुक्रवारी 23 वर्षीय महिला एका रिक्षामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्याची माहिती रिक्षा वाल्याने दिली. त्यानतंर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी शुद्धीवर आल्यानंतर तीने पोलिसांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पतीशी भांडण झाल्यामुळे तीने घर सोडले होते. त्यानंतर ती बस स्थानकावर पोहोचली तिथे तिला एक अनोळखी व्यक्ती भेटला. महिलने त्याच्याकडे पैशांती मदत मागितली. त्यानंतर त्याने अन्य एका व्यक्तीला फोन करत सदर महिला पैशांसाठी त्याच्यासोबत वेळ घालवण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी महिलेला एका लॉजमध्ये घेऊन गेला आणि महिलेला अनैसर्गिंक लैगिंक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. महिलेने नकार दिला असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत असून पीडितेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.