
देशात महिलांवरील बलात्काराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एका 21 वर्षीय तरूणीने शारिरीक अत्याचाराला कंटाळून स्वत:चे जीवन संपवले आहे. यासंदर्भात तिने एक चिठ्ठी लिहून त्यात आरोपीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च (शुक्रवारी) या तरूणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळला. यासंदर्भातील माहिती पिडीतेच्या आईने पोलिसांना दिली. पिडीता, तिच्या दोन बहिणी आणि तिची विधवा आई असा त्यांचा परिवार होता. पीडितेची आई फुलं, हार विकून घर चालवत होती. अशी माहिती मृत तरूणीच्या आईने दिली.
7 फेब्रुवारी रोजी घटामपूर येथील एक नातेवाईक मुलीला कॉलेजपर्यंत सोडतो असे सांगून घेऊन गेला. यानंतर त्याने तिला कॉलेजला घेऊन न जाता एका हॉटेलवर नेले. तिथे त्याने मुलीला चहामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. याचाच वापर करून तो मुलीला धमकावून तिच्यावर सातत्याने बलात्कार करत होता. ही संपूर्ण घटना पीडित तरूणीने आईला सांगितली. यानंतर आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. अशी माहिती मृत तरुणीच्या आईने सांगितली.
आरोपीला अटक झाली होती, मात्र तरुणीवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारामुळे ती अस्वस्थ झाली होती. याच नैऱ्याश्यातून पीडितेने स्वत: संपवण्याचा निर्णय घेतला. पीडिता घरात एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिने आरोपीच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली होती. तु माझं आयुष्य उद्ध्वस्थ केलं आहेस. तुझ्यामुळे मला समाजात तोंड दाखवायची दाखवता येत नाहीये. माझ्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे मी हे पाऊल उचलत आहे. असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. अशी माहिती आईने पोलिसांना दिली. यादरम्यान पोलिसांनी मृचदेह शवविच्छेदनासाठी दिला असून पुढीव तपास सुरू केला आहे.